Search

Sales and Distribution in Manufacturing Industry

Updated: May 29, 2020

| Sales and Distribution in Manufacturing Industry |

| उत्पादन उद्योगात विक्री व वितरण |

उत्पादन उद्योगात आज सर्वात मोठे काम हे विक्री आणि वितरण हे बनले आहे. यासाठी पैसे माणसे आणि व्यवस्था हे असले पाहिजे. भरपूर उद्योग जोमाने सुरु होतात मात्र अगदी अल्प कालावधी मध्ये बंद होण्याच्या मार्गावर येतात. काही उद्योग उधारी वर विक्री करतात आणि मग फसतात उधारी हि जादू आहे आपण देतो आणि ग्राहक गायब होतो, झाला मजेचा भाग पण सत्य आहे. तुम्हाला वाटेल मि काय तुम्हाला गोष्ट सांगत बसलोय मुद्याचं काय ते सांगा पण आपल्याला माहिती पाहिजे. कि आता वितरण कस सुरु आहे. जर तुम्हाला हि याच अडचणी येत असतील तर हा लेख तुमच्या कामाचा आहे मित्रानो, शेवट पर्यंत वाचा कारण पूर्ण उपाय माहिती असतील तर अधिक जास्त चांगले काम करता येईल.

उत्पादन खर्चाविषयी अचूक माहिती

होय बरोबर वाचताय, तुम्ही म्हणाल यात काय नवीन. हे तर सर्वच व्यावसायिक करत असतात. होय पण अपूर्ण आपण न काळात काही खरंच उपादान खर्चतात ग्राह्य धरतच नाही इथेच गफलत होते. खर्च खालील प्रमाणे आहेत:

१. कच्या मालाची किंमत

२. कच्या मालाच्या खरेदीवरील दलाली व कर

३. इंव्हेटोरी मॅनेजर व खरेदी अधिकाऱ्याचे वेतन

४. कच्या मालाची हाताळणी/साठवणूक खर्च (वाहतूक खर्च + गोडाउन भाडे)

५. उत्पादन प्रक्रिया खर्च (वेतन खर्चासाहित )

६. गुणवत्ता तपासणी खर्च

७. पॅकेजिंग खर्च

८. उत्पादन साठवणूक खर्च (प्रति तास )

९. उत्पादन प्रबंधन खर्च

१०. उत्पादन वाहतूक खर्च

उत्पादनाची किंमत

बरेच व्यवसाय प्रतिस्पर्ध्याच्या भीतीने आपली उत्पादनाची किंमत कमी ठेवतात. पण खरंच विचार करा कमी किंमत ठेवल्याने खरेदी वाढेल का? होय पण विक्री तुम्हालाच करावी लागेल. जर दुसरा तिथे असला पाहिजे तर त्याला चांगला मोबदला मिळाला पाहिजे. तरच तो तुमची उत्पादने विकेल. हे असे झाले नाही येत म्हणून गोळी घ्याची हे एकदा ठीक आहे रोज नाही. तसेच विशिष्ट कालावधी डिस्काउंट असेल तर ठीक आहे. पण मूळ किंमत मात्र हि जास्त असायला पाहिजे. मूळ किंमत हि तुमच्या उत्पादन खर्चाच्या ७०% टक्के पेक्षा जास्त पाहिजे. ज्याला आपण एम आर पी म्हणतो ७०% कमीत कमी मार्जिन असली पाहिजे.४००% नेऊ शकता हे तुमच्या उत्पादनावर व गुवत्तेवर आधारित असेल.

उदा . १०० रुपयांचे बिस्कीटचे पॅकेट आहे याचा उत्पादन खर्च हा ३० असला पाहिजे. ७० रूपांचा वापर हा वितरणासाठी लागणारा खर्च व उत्पादकांचा नफा यासाठी होऊ शकतो.

वितरकांची निवड

वितरकांची निवड ही एक प्रक्रिया स्थापित करावी त्यामध्ये सर्व गोष्टीचे मोजमाप असावे.

वितरणासाठी भूभाग विभागणी करा

१. गाव/शहरानुसार

२. जिल्ह्यानुसार

३. राज्यस्तरीय

४. राष्ट्रीय पातळीवर

५. आंतराष्ट्रीय

ठरवा वितरण प्रबंधन कोण करणार?

१. स्व:वितरण विभाग

२. सुपर स्टोकिस्ट/ ठोक वितरक

३. वितरक

४. प्रबंधन संगठन/तिसरी मंडळी

वितरक कोण असेल ?

ठोक वितरक / वितरक/ ठोक विक्रेता / किरकोळ विक्रेता

किती वर्षांपासून या कामात आहे?

..............................................

गुंतवणुकीची तयारी किती आहे ?

.............................................

गोडाउनची जागा किती आहे ?

............................................

गोडाउन कुठे आहे ?

............................

कुठल्या भागासाठी वितरण करू इच्छित आहे ?

..................................................................

वितरणाचे स्तर व किमती

किरकोळ विक्रेता - ठोक भाव - किमान ऑर्डर .........

ठोक विक्रेता - डीलर प्राईस - किमान ऑर्डर ..........

वितरक - स्टोकिस्ट रेट - किमान ऑर्डर ..........

ठोक वितरक - सुपर रेट - किमान ऑर्डर ..........


23 views0 comments

Smart Vitaran Sales and Distribution

Lakhegaon road, Karkin, Paithan, Aurangabad, 431105 

Contact: +91-98347-92887 | smartvitaran@gmail.com

  • LinkedIn
  • Facebook
  • Twitter
  • YouTube
  • Instagram
LOGO AUG-20.png

Smart वितरण